Sunday 12 February 2017

कथा :- पाणीपुरी


     
         "बरेच दिवस झाले पाणीपुरी खाल्ली नाही!" क्लास सुटल्यानंतर सौरभ म्हणाला.आता पाणीपुरीचे नाव ऐकुन समस्त पेंगायला लागलेल्या मुलांच्या तोंडाला पाणी सुटलं.मग कोणाचा वाढदिवस आहे का आणखीन पार्टी उकळण्यासाठी काही कारण सापडतं का ह्याचा शोध सुरू झाला.कुठूनही पार्टीची सोय होत नाही हे लक्षात आल्यावर मग खिशात हात घालुन पाणीपुरी खाण्याइतपत पैसे आहेत का ह्याची तपासणी चालु झाली ,ज्यांच्याकडे नव्हते त्यांनी वेगवेगळी कारणं काढून घरी जाणे पसंद केलं.मग उरलो आम्ही दोघंचं मग सुरू झाला तो पाणीपुरी कुठे खायला जायचं विचार?? कुठे बरं जावं  मग एक दोन (तथाकथीत) पॉश व स्वच्छ ठिकाणी खायला जावं असा विचार आला पण ते दुपारी उघडे नसतात आणी तिथे जाऊन मिनरल वॉटरमधली पाणीपुरी खाण्याईतपत अत्ता पैसे पण नाहीत अस म्हणुन आम्ही गाडी चालु केली आणि घरी जाताजाता वाटेत कुठे आहे का ते बघु अन तिथे खाऊ असं म्हणुन मार्गस्थ झालो.वाटेत एका कॉलेज समोर पाहीलं तर ओळीनी ३-४ भैय्ये लोक पाणीपुरी चा ठेला लाउन उभारले होते मित्र म्हणला त्यांच्याकडची एकदा खाऊन बघु म्हणुन आम्ही एका बंद दुकानाच्या बाहेर गाडी पार्क करून पाणीपुरी खायसाठी निघालो.
        पहील्या पाणीपुरी वाल्या कडे गेलो तर तो मळकटलेला होता म्हणुन त्याच्याकडे खायला नको असं म्हणुन दुसर्या पाणीपुरी वाल्या कडे गेलो तोपण तसाच निघाला शेवटी तिसर्या पाणीपुरी वाल्याकडे गेलो आणि सर्वात पहीला त्याला विचारलं की "तुझ्याकडे साबण आहे का?" त्यानी मान डोलावली (ती मान होकारार्थी होती की नकारार्थी हे अजुन समजलेलं नाही) मग त्यानी भांडी घासण्यासाठी ठेवलेलं "निरमा" साबण दाखवल आम्ही त्याला हात धुवायला सांगीतले कारण त्यानी एक दोन दिवस आंघोळ केलेली असेल असं काही दिसत नव्हतं,अखेरीस त्याला स्वच्छ करून दोन पाणीपुरींची ऑर्डर दिली.त्यानी लगेच बनवुन दिली ती आम्ही खाल्यानंतर त्याला पैसे दिले.पैसे देत असतानाच "भैय्या कधीतरी आंघोळ करत जा" असा खोचक टोमणा मारला त्याला कितपत तो कळला असावा नाही माहीत कारण मराठी कच्चं दिसतं होतं त्याचं.हे महाराष्ट्रात येतात तरी ह्यांना मराठी बोलायचं नसतं हे पाहुन ह्यांना परत पाठवण्याची किती गरज आहे हे कळुन येतं.मात्र त्याला आम्ही आंघोळ अन स्वच्छतेवर मारलेले टोमणे कळले असावेत कारण त्या दिवशीनंतर बरेचदा आम्ही त्या रोडवरून जात असताना त्यांनी आम्हाला स्वत:हुन हाक मारून आंघोळ करत असल्याचं सांगीतलं।।

©®मिहीर कुलकर्णी
   

1 comment:

आठवणींचे उसासे

खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...